नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान चुकून पंजाबची सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला. या जवानाला पाकिस्तानी रेंजर्सने ताब्यात घेतले असून त्याच्या सुटकेसाठी दोन्ही लष्करांत चर्चा सुरू आहे, असे अधिकार्यांनी गुरुवारी सांगितले.१८२ व्या बटालियनचे कॉन्स्टेबल पी.के. सिंग यांना बुधवारी फिरोजपूर सीमेवर पाकिस्तान रेंजर्सनी पकडले. जवान लष्करी गणवेशात होता आणि त्याच्याकडे सर्व्हिस रायफल होती. हा जवान सावली पाहून विश्रांतीसाठी पुढे गेला तेव्हा पाकिस्तानी रेंजर्सने त्याला पकडले.
Fans
Followers